विद्या विनयेन शोभते
STUDENT POWER NATION POWER

Monday, November 23, 2009

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी अभाविपचे मुंबईविद्यापीठात आंदोलन:

मुंबई - अभियांत्रिकी शाखेच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. ८) मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस येथे आंदोलन केले.
दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १७ सप्टेंबरपासून घेण्याबाबतचे पत्र विद्यापीठाने परीक्षा नियंत्रक प्रा. विलास शिंदे यांना पाठविल्याचे अभाविपच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले असले, तरी विद्यापीठाने मात्र कालच या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केल्याचे म्हटले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तीन सेमिस्टरनंतर नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षाअर्ज भरावा लागतो. परंतु हा नियम विद्यापीठाने महाविद्यालयांना कळविला नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज जुन्याच अभ्यासक्रमानुसार फेब्रुवारी २००९ मध्ये भरून घेण्यात आले. अर्ज भरून घेताना विद्यापीठाने कोणताही आक्षेप घेतला नाही. मे महिन्यात होणाऱ्या परीक्षादेखील विद्यापीठाने घेतल्या नाहीत. ही चूक विद्यापीठाची असून अभियांत्रिकी शाखेच्या या विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्वरित घेऊन लवकरात लवकर निकाल जाहीर करावा आणि उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील सेमिस्टरला बसण्याची परवानगी द्यावी, तसेच या विद्यार्थ्यांना प्रॅक्‍टिकल व लेक्‍चर्सना बसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी "अभाविप'ने विद्यापीठाकडे केली आहे. असे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

No comments:

Post a Comment

>